Ad will apear here
Next
‘फ्लो’च्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी संगीता ललवाणी
संगीता ललवाणी
पुणे : ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ची (फिक्की) महिला शाखा असलेल्या ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘फ्लो’ या संस्थेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजिका संगीता ललवाणी यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘फ्लो’च्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. संगीता ललवाणी यांनी संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा वर्षा चोरडिया यांच्याकडून या पदाची सूत्रे स्वीकारली. 

संगीता ललवाणी या बांधकाम व सराफी क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी या आधी ‘फ्लो’च्या पुणे विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा आणि खजिनदार म्हणून काम सांभाळले आहे. संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे फ्लो हाफ मॅरेथॉन’च्या आयोजन समितीच्याही मागील तीन वर्षांपासून त्या प्रमुख आहेत. उद्योग आणि व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन महिलांचे सबलीकरण, आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने ‘फ्लो’ या संस्थेची १९८३ साली स्थापना करण्यात आली. या संस्थेत पाच हजारांपेक्षा अधिक  महिला उद्योजक, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट एक्झिक्यूटिव्हजचा समावेश आहे. या संस्थेचे देशभरात एकूण १४ विभाग आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZTUBO
Similar Posts
‘प्रत्येक स्त्रीला मैत्रिणी हव्यातच’ पुणे : ‘आपण महिला अनेक गोष्टी मनात ठेवत असतो, या सर्व गोष्टी वेळच्या वेळी व्यक्त झाल्या नाहीत, तर त्याचा आपल्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला मन मोकळे करण्यासाठी मैत्रीणी असणे गरजेचे आहे,’ असे मत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पुणे ‘फिक्की फ्लो’च्या अध्यक्षपदी रितू छाब्रिया पुणे : ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ची (फिक्की) महिला शाखा असलेल्या फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन (फ्लो) या संस्थेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी उद्योजिका आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांची निवड करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या ‘फ्लो’च्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला
‘एससीडब्ल्यूईसी’च्या परिषदेवर संगीता ललवाणी यांची नियुक्ती पुणे : पुण्यातील प्रसिद्ध महिला उद्योजक संगीता ललवाणी यांची सार्क चेंबर वूमन आंत्रप्रेन्य़ुअर्स काऊन्सिल (एससीडब्ल्यूईसी) या संस्थेने आपल्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
‘फिक्की फ्लो’तर्फे आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप पुणे : महिलांसाठी देशपातळीवर काम करणाऱ्या ‘फिक्की फ्लो’ या संस्थेच्या पुणे शाखेतर्फे ‘वूमन अँड हायजीन’ या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील ४०० आदिवासी मुलींना पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. या वेळी खासदार वंदना चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language